Vijaykumar Dudhale
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश जागा वाटपाच्या समितीत करण्यात आलेला आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही जागा वाटपाच्या कमिटीत समावेश करण्यात आलेला आहे.
विधीमंडळातील काँग्रेसचे गटनेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हेही या समितीत असणार आहेत.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हेही काँग्रेसकडून जागा वाटपाच्या चर्चेत समाविष्ट होऊ शकतात.
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेसचा चेहरा सतेज पाटील यांच्यावरही जागा वाटपाच्या संदर्भातील जबाबदारी असणार आहे.
माजी मंत्री नितीन राऊत आणि आरीफ नसीम खान यांचाही समावेश या महाराष्ट्र निवडणूक कमिटीत असणार आहे.
खासदार वर्षा गायकवाड ह्या मुंबईतील जागा वाटपाच्या चर्चेत सहभागी होणार आहेत.
भाई जगताप आणि अस्लम शेख हे दोघेही मुंबई जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा करतील.