Akshay Sabale
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीतील आमदार बाबाजानी दुर्राणी यांची भेट घेतली. त्यामुळे ते आमदार दुर्राणी 'तुतारी' हाती घेणार असल्याची चर्चा रंगली आहे.
आमदार दुर्राणी 'तुतारी'कडून पाथरी मतदारसंघातून विधानसभेला लढू शकतात. त्यानिमित्त त्यांची राजकीय कारकीर्द जाणून घेऊया...
पाथरी विधानसभा मतदासंघावर मजबूत पकड असलेले दुर्राणी परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा विश्वासू अल्पसंख्याक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
पाथरी नगर परिषदेतून नगरसेवक पदापासून आमदार दुर्राणी यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली होती.
ते नगर परिषदेचे अध्यक्ष, वक्फ बोर्डाचे सदस्य होते.
2004 ते 2009 दरम्यान ते पाथरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. शिवसेनेचे तीन टर्म आमदार राहिलेल्या हरिभाऊ लहाने यांचा दुर्राणी यांनी पराभव केला होता.
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले होते.
10 जुलै 2018 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची राष्ट्रवादीकडून निवड करण्यात आली होती.
27 जुलैला आमदार दुर्राणी यांची विधान परिषदेची मुदत संपत आहे. त्यामुळे आमदार दुर्राणी 'तुतारी'कडून पाथरी मतदारसंघातून निवडणूक लढू शकतात.