Cabinet Decision : 'उमेद' आणि 'ई-नाम'मुळे ग्रामविकासाला मिळणार नवा वेग; मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्वाचे निर्णय!

Rashmi Mane

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवणार. अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय. एकूण 1 हजार 902 पुरस्कार दिले जाणार. (ग्राम विकास विभाग)

Cabinet Decisions | Sarkarnama

'उमेद मॉल' जिल्हा विक्री केंद्रांची उभारणी

'उमेद’- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 10 जिल्ह्यात 'उमेद मॉल' (जिल्हा विक्री केंद्र) ची उभारणी करणार. राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार. (ग्राम विकास विभाग)

Maharashtra Cabinet Decisions | sarkarnama

'ई-नाम' योजनेचा विस्तार

‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी. राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन होणार. त्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे सनियंत्रण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, 1963 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. (सहकार व पणन विभाग)

Cabinet Decisions | Sarkarnama

महिलांवरील अत्याचारासाठी विशेष न्यायालये

महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन होणार. (विधि व न्याय विभाग)

Maharashtra Cabinet Decision

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन नवीन न्यायालये

पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना. या न्यायालयांसाठी पदांना मंजूरी. (विधि व न्याय विभाग)

Maharashtra Cabinet Decision

वर्धा – बोर प्रकल्प दुरुस्तीस मंजुरी

वर्धा जिल्ह्यातील बोर मोठा प्रकल्प (ता. सेलू) प्रकल्पाच्या विशेष दुरुस्तीअंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नुतनीकरणाच्या कामासाठी 231 कोटी 69 लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. (जलसंपदा विभाग)

Maharashtra Cabinet Takes 6 Decisions | Sarkarnama

वर्धा – धाम प्रकल्पासाठी विशेष दुरुस्ती

वर्धा जिल्ह्यातील धाम मध्यम प्रकल्प (ता. आर्वी ) प्रकल्पाच्या विशेष दुरुस्तीअंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नुतनीकरणाच्या कामासाठी 197 कोटी 27 लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. (जलसंपदा विभाग)

Maharashtra Cabinet Decision | Sarkarnama

ॲडव्होकेट अकॅडमीसाठी जमीन मंजूर

महाराष्ट्र व गोवा वकील परिषद, मुंबई यांना ॲडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे कळवा येथे जमीन देण्यास मान्यता. (महसूल विभाग ).

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde | Sarkarnama

Next : लाडकी बहिण योजनेतील 26 लाख अपात्र महिलांवर कारवाईचे संकेत; शासनाची मोठी हालचाल 

येथे क्लिक करा