Amol Sutar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये आज विधिमंडळाच्या लॉबीमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला.
त्यामध्ये मालेगावचे आमदार मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात हा प्रकार झाल्याचं समोर आले. शिवसेनेत अनेक आमदार हे कायमच वादग्रस्त ठरत आहेत.
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे वाघाची शिकार करून त्याचा दात गळ्यात बांधला, बिबट्या वगैरे तर आपण असेच पळवतो, असं वक्तव्य करून नुकतेच वादग्रस्त ठरले आहेत.
हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा, या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.
मंत्री गुलाबराव पाटील “मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाहीत आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही,” या जाहीर वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत आले होते.
सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी गेल्या वर्षी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने चांगलेच वादग्रस्त ठरले. यामुळे त्यांच्यावर टीका झाली.
मंत्री तानाजी सावंत यांनी सत्तांतर होताच मराठा समाजाला आरक्षणासाठी ‘खाज’ निर्माण केल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर निर्माण झालेल्या वादावर माफीही मागितली.
आदित्य ठाकरेंनी प्रियांका चतुर्वेदी यांचं सौंदर्य पाहून राज्यसभेची उमेदवारी दिली, असे आमदार संजय शिरसाट यांनी वक्तव्य केले होते. तसेच सुषमा अंधारे यांच्याबाबतही ते बोलले होते.
मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहिसर कोकणी पाडा येथे एका जाहीर कार्यक्रमात हात-पाय तोडण्याची भाषा केली होती, तर दुसऱ्या दिवशी जामीन मिळेल असे ते बोलले होते.
R