Aslam Shanedivan
क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा निर्णय नुकताच न्यायालयाने दिला.
त्यांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली असून न्यायालयाने अटकवॉरंटही काढला आहे. हा निर्णय येताच त्यांची तब्बेत बिघडली असून ते मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल झाले आहेत.
दरम्यान तुरुंगात जाण्याची वेळ येताच किंवा तुरुंगात असल्याने बाहेर येण्यासाठी आधी देखील काही राजकीय नेत्यांनी बड्या असामींनी अशा पद्धतीने रुग्णालयाचा आसरा घेतला आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव हे तुरुंगात होते आणि त्यांना बरेच आजार उद्भवल्यानंतर उपचारासाठी वैद्यकीय जामीन मिळविला होता.
राज्याचे माजी अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे महाराष्ट्रसदन गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असताना वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळाला होता
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक हे कुख्यात दाऊद इब्राहिमशी आर्थिक हितसंबंध असल्याच्या कारणांवरुन तुरुंगात होते. त्यांना देखील वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळविला आहे.
त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळविला असताना ते आता महापालिका निवडणुकीच्या प्रचारात पुढे आहेत.
तुरुंगातील अनेक अडचणी आणि त्रासांपेक्षा शासकीय किंवा खासगी रुग्णालयातील सोयींसाठीच आरोपी किंवा कैदी हे रुग्णालयांचा आसरा घेतात.