Pradnya Satav : 'हात' सोडून 'कमळ' हातात! काँग्रेसला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रज्ञा सातव यांचा असा आहे राजकीय प्रवास!

Rashmi Mane

धक्कादायक राजकीय निर्णय

काँग्रेसला मोठा धक्का देत आमदार प्रज्ञा सातव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसशी निष्ठा

अनेक वर्षे काँग्रेसशी निष्ठा राखलेल्या प्रज्ञा सातव यांच्या या पावलामागे नेमकं कारण काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेतृत्व

प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू सहकारी दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव यांचे 2021 मध्ये निधन झाले, त्यानंतर पक्षाने त्यांच्या राजकीय वारसा म्हणून प्रज्ञा सातव यांच्याकडे नेतृत्व सोपवले.

राजकारणात प्रवेश

प्रज्ञा सातव यांचा राजकीय प्रवास घरातूनच सुरू झाला. सामाजिक कार्य आणि जनतेशी थेट संपर्क यामुळे त्यांनी स्थानिक पातळीवर वेगळी ओळख निर्माण केली. सुरुवातीपासूनच त्यांनी पक्षसंघटन आणि जनहिताच्या मुद्द्यांवर भर दिला.

काँग्रेसमधील वाटचाल

काँग्रेसमध्ये काम करताना प्रज्ञा सातव यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागात विशेष काम केले.

विधान परिषदेच्या आमदार

प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष असून सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर 2021 साली विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली होती. 

राजकारण

प्रज्ञा सातव या पहिल्यांदा 2021 मध्ये पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आल्या.

अंतर्गत नाराजी वाढली?

मात्र, कालांतराने पक्षातील अंतर्गत राजकारण आणि दुर्लक्षामुळे प्रज्ञा सातव नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतरअखेर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत सर्वांना धक्का दिला आहे.

Next : कोकाटेंची आमदारकी जाणार? शिक्षेमुळे पद गमवावे लागलेल्या नेत्यांमध्ये कोण-कोण? 

येथे क्लिक करा