Mayur Ratnaparkhe
राम मंदिराच्या लोकार्पणाच्या निमंत्रणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, आव्हाडांच्या वक्तव्यांने राजकीय वातावरण तापलं आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्या आहाराविषयी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे
राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहरी होता, असं विधान आव्हाडांनी केलं आहे.
१४ वर्षे वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असं आव्हाडांनी विचारलं आहे.
'आपण इतिहास वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. असं आव्हाड म्हणतात.
राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. असा दावा आव्हाडांनी केला आहे.
रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे, असंही आव्हाडांनी म्हटलंय.
१४ वर्षे जंगलात असणारे राम शिकार करायचे, असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याविषयी केलेल्या विधानाचे हिंदू संघटनांमध्ये पडसाद उमटू लागले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे राज्यव्यापी अधिवेशन शिर्डीत होत असताना आव्हाडांनी ही विधानं केली आहेत.