Roshan More
श्री छत्रपती राजाराम कारखान्याच्या एमडींना भररस्त्यात सतेज पाटील यांच्या समर्थकांनी मारहाण केली. त्यामुळे पुन्हा एकदा पाटील विरुद्ध महाडिक वादाची ठिणगी पडली आहे.
सतेज पाटील यांचे समर्थक असणाऱ्या माजी नगरसेवकासह सात ते आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
कारवाईची मागणी
महाडिक गटाकडून सतेज पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
सतेज पाटील गट आणि महाडिक गट कोल्हापूरच्या राजकारणात एकत्र होते. मात्र, सतेज पाटील हे 2014 मध्ये पराभूत झाल्यानंतर संघर्ष अधिक वाढला.
राजाराम कारखान्याच्या निवडणूक प्रचारात दोन्ही गटातील वाद विकोपाला गेला होता. निवडणुकीत महाडिक गटाने बाजीने मारली.
कारखान्याच्या एमडीला मारहाण झाल्यानंतर माजी आमदार अमल महाडिक यांनी संताप व्यक्त केला. मारहाण करण्यात सतेज पाटील यांनीच कार्यकर्त्यांना फूस लावली, असा आरोप त्यांनी केला.
विरोधकांचा ऊस गाळप होत नसल्याच्या निषेधार्थ सतेज पाटील यांनी मारहाण झालेल्या दिवशीच मोर्चा काढला होता. ठिय्या आंदोलनाचा इशारा देखील पाटील यांनी दिला होता.
पाटील-महाडिक वादात एमडीला मारहाण होत असेल तर निवडणुकीत काय होणार, याची चिंता व्यक्त केली जात आहे.