Vijaykumar Dudhale
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्या डोक्यावर हात ठेवून आम्हाला पन्नास खोकी दिली आहेत, असं जाहीर करावं.
मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की, आम्हाला पन्नास खोकी मिळालेली नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेसमोर एकदाचा सोक्षमोक्ष होऊनच जाऊ द्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित ‘मला काय सांगायचं’ हे नाटक येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर येणाऱ्या नाटकाला प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ‘पन्नास खोके एकदम ओके’ या नाटकाची तयारी सुरू आहे.
उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यापासून ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिव्या घालण्याशिवाय दुसरे कोणतेही काम करत नाहीत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पोटशूळ उठला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजवर केलेली कामे आणि भविष्यात महाराष्ट्राच्या प्रगतिपथाचा घेतलेला वेध हे नाटकातून सांगणार आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नाटक हे फेक नेरिटिव्हचा भाग असणार आहे
उद्धव ठाकरे हे यापुढे मुख्यमंत्री होणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे- शहाजी पाटील