Pradeep Pendhare
बालभारतीच्या पहिलीच्या मराठी पुस्तकातील 'जंगलात ठरली मैफल' या कवितेतील 'वन्समोअर' या इंग्रजी शब्दावरून मराठी भाषाप्रेमींचा आक्षेप
'जंगलात ठरली मैफल' या कवितेत 'वन्समोअर, वन्समोअर झाला शोर!' या ओळीवर वाद निर्माण झाला असून, ही कविता समाज माध्यमांमध्ये चांगलीच व्हायरल झाली.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावर सावरासावरी करत 'वन्समोअर'ला पर्यायी शब्द सांगा, असे आवाहन केले.
यमक जुळवण्यासाठी एखाद्यावेळी इंग्रजी शब्दाचा वापर केल्यास, त्यासा मोठा बाऊ नको करायला. टेबल हा शब्द सर्रास वापरतोना!मराठीत अनेक रुळलेले इंग्रजी शब्दांचा वापर होतो.
पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळात त्या-त्या विषयाचे तज्ज्ञ असतात. त्यांच्या कामात आपण हस्तक्षेप करत नसल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.
18 वर्षापासून रखडलेले मराठी भाषा धोरण आपण आणले. त्यावेळी कोणाला कळवळा का? आला नाही.
राज्यातील सरकारी कार्यालयांमध्ये मराठीत बोलणे आम्ही बंधनकारक केले.
विरोधकांना मराठीवरून सुनावताना आम्हाला मराठी भाषेचा अभिमान असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.