Jagdish Patil
नेपाळ सरकारने फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसह 26 सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातल्यामुळे युवकांचा संताप अनावर झाला आहे.
संतापलेल्या तरूणांनी नेपाळमध्ये मोठं आंदोलन उभारलं ज्याला हिंसक वळण लागलं असून त्याची झळ खुद्द देशाच्या पंतप्रधानांना बसली आहे.
कारण या आंदोलनानंतर नेपाळमधील 10 मंत्र्यांसह पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
तरुणांनी सरकारविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाला Gen Z नाव देण्यात आलं. आंदोलनानंतर काही तासांतच सोशल मीडियावरील बंदीचा निर्णय मागे घेण्यात आला.
मात्र, या आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू तर 300 हून अधिक लोक जखमी झालेत.
मात्र, नेपाळ मधील या आंदोलनाचा जनक नेमका कोण आहे आणि कुणाच्या सांगण्यावरून तरुणाई रस्त्यावर उतरली? याबाबतची माहिती जाणून घेऊया.
नेपाळमध्ये अवघ्या 24 तासांत सत्तातर घडवून आणण्यास सुदान गुरुंग नावाचा 36 वर्षांचा तरूण कारणीभूत ठरला आहे.
'हामी नेपाल' सुदान गुरुंग हाच जेन-झी आंदोलकांचा नेता असून तो 'हामी नेपाल' या संघटनेचा अध्यक्ष आहे. तो पूर्वी केवळ एक कार्यक्रम आयोजक होता.
2015 सालच्या भूकंपात सुदानचा मुलगा मरण पावला. त्यानंतर तो आपत्ती निवारणाच्या कामात सहभागी होऊ लागला.
धारण येथील बी. पी. कोइराला आरोग्य विज्ञान संस्थेतील पारदर्शक कारभारासाठी त्याने आंदोलन उभारलं होतं. याच 'घोपा कॅम्प' आंदोलनामुळे तो फेमस झाला.