Sampat Devgire
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक सध्या नाशिकमधील विविध जॉगिंग ट्रॅकवर जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत.
नागरिकांकडून कर्णिक तक्रारी,अडचणी आणि सूचना समजून घेत आहेत.
अनेक प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणांना आणि पोलिसांना ते सूचना करीत आहेत.
जॉगिंग ट्रॅकवर पोलिस अन् नागरिक यांच्यात संवाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहरातील सुव्यवस्था उत्तम करण्यासाठी निवडलेला आयुक्तांचा हा पर्याय नागरिकांना भावला आहे.
मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांची ते मनमोकळ्या गप्पा मारतात,तक्रारी समजून घेतात.
शहरातील कायदा सुव्यवस्था अन् वातावरण चांगले राहण्यासाठी या उपक्रमाची मोठी मदत होत आहे.
पोलिस ठाण्याचे अधिकारी, 100 पोलिस नागरिकांची संवाद साधून पोलिस-नागरिक मैत्रीचे नवे पर्व सुरू करीत आहेत.