Chetan Zadpe
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI) चे दिग्गज दिवंगत नेते इंद्रजित गुप्ता यांनी लोकसभा निवडणूक सर्वात जास्त वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे.
इंग्लंडमध्ये शिकत असताना कम्युनिस्ट चळवळीत सामील झाले. शेतकरी आणि कामगारांसाठी काम करण्यासाठी ते कोलकात्याला परतले.
कोलकाताच्या बंदर आणि गोदी कामगारांसाठी काम करण्यास सुरुवात केली. तेव्हापासूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती.
1960 च्या पोटनिवडणुकीत कोलकाताच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर ते निवडून आले होते.
माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय गृहमंत्री राहिले.
सीपीआयचे सरचिटणीस म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर 'थर्ड फोर्स' म्हणजेच तिसऱ्या आघाडीचे ते प्रमुख नेते बनले.
1977 ची निवडणूक सोडली तर 1960 ते 2001 या दरम्यान ते तब्बल 11 वेळा खासदार म्हणून निवडून आले. पश्चिम बंगालच्या कलकत्ता दक्षिण पश्चिम, अलिपूर, बसीरहाट आणि मिदनापूर मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले.
R