Jagdish Patil
अनेकदा असं होतं की, आपणाला एखाद्या वेगळ्या विषयात करिअर करायचं असतं पण नाईलाजाने दुसऱ्याच विषयाचा अभ्यास करावा लागतो.
शांभवी मिश्रा यांच्यासोबतही असंच काहीसं घडलं, कारण त्यांना B.Tech करायचं नव्हतं तरीदेखील नाईलाजाने ते करावं लागलं.
शांभवी ह्यूमैनिटीज या विषयाचा अभ्यास करायचा होता, पण त्यांच्या कॉलेजमध्ये हा विषय उपलब्ध नसल्यामुळे त्यांना सायन्सचा अभ्यास करावा लागला.
यूपीतील अमेठी येथे राहणाऱ्या शांभवी आता IPS अधिकारी आहेत. बीटेक करताना त्यांनी त्यांनी UPSCची तयारी सुरू केली होती.
B.Tech नंतर त्यांनी एका बँकेत PO म्हणून नोकरी केली. यावेळी त्यांनी UPSC चा अभ्यासही सुरू ठेवला होता.
शांभवी यांनी पहिल्याच प्रयत्नात प्रीलिम्स आणि मेन्स दोन्ही परीक्षा क्रॅक केल्या पण मुलाखतीत त्यांच्या पदरी अपयश आलं.
मात्र, दुसऱ्या प्रयत्नात 199 व्या रँकने UPSC क्रॅक करत त्या IPS अधिकारी बनल्या.
IPS झाल्यानंतर शांभवी यांनी तिसऱ्यांदा परीक्षा दिली, त्यावेळी त्यांची 116 व्या रँकने दुसऱ्यांदा IPS पदी निवड झाली.