Pradeep Pendhare
हिंदूहृयसम्राट बाळासाहेबांचे विचार नव्या पिढीसाठी स्फूर्तिदायक ठरावेत, म्हणून विचारांची कलादालनात मांडणी असेल.
हुतात्मा चौक, जुनी मुंबई, प्रबोधनकार ठाकरे यांचे तैलचित्र आणि विचार इथं नव्या पिढीसमोर ठेवले जाणार आहेत.
‘मुंबई बिफोर बाळासाहेब’ या संकल्पनांतर्गत जुन्या मुंबईचे दर्शन या ठिकाणी होणार असून मराठी माणूस केंद्रस्थानी असेल.
शिवसेनाप्रमुखांचे कलादालन उभाण्यासाठी पूर्वी 50 कोटी रुपये निधी मंजूर असून त्यातून काम सुरू आहेत.
सरकारने आता कलादालन परिसर सुशोभीकरण करण्यासाठी आणखी 20 कोटी रुपये मंजूर केलेत.
कलादालनमध्ये बाळगोपाळांसाठी कल्पक आणि नावीन्यपूर्ण असे ‘चिल्ड्रेन सेंटर’ असेल.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आभासी जंगलाची आणि अॅक्वारियमची निर्मिती असणार आहे.
ज्येष्ठ नागरिक दालन, संगीत कक्ष, रंगमंच अशी व्यवस्था या कलादालनात असणार आहे.