Jagdish Patil
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांना माझगाव कोर्टाने 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.
याच प्रकरणामध्ये राऊतांना 15 दिवसांच्या कैदेसह 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर शिवडी कोर्टाने शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
संजय राऊत आणि मेधा सोमय्या यांच्यातील कायदेशीर लढाईचं हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊया.
राऊतांनी मेधा सोमय्यांवर मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात शौचालये बांधण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या मदतीने घोटाळ्याचा आरोप केला होता.
2008 साली युवक प्रतिष्ठानच्या वतीने 16 ठिकाणी ही सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली. या प्रतिष्ठानच्या संचालिका मेधा सोमय्या आहेत.
हे बांधकाम महापालिकेच्या पर्यावरण विभागाची परवानगी न घेता केल्याचा आरोप राऊतांनी केला. तर 154 पैकी 16 शौचालये या प्रतिष्ठानतर्फे बांधण्यात आली होती.
घोटाळ्याचा आरोप झाला तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर होते. हा मुद्दा विधानसभेमध्येही उपस्थित करण्यात आला होता.
तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले, त्यानुसार त्यावेळच्या आयुक्तांनी चौकशी करून सरकारला अहवाल सादर केला होता.