Vijaykumar Dudhale
महाराष्ट्र विधानसभेचे 1972 ते 1977 दरम्यान अध्यक्ष राहिलेले शेषराव वानखेडे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. वानखेडे यांनी 1980-81 ते 1982-83 पर्यंत अध्यक्ष आणि 1972-73 ते 1979-80 पर्यंत उपाध्यक्ष होते. बॉम्बे क्रिकेट असोसिएशनचे त्यांनी 1963-64 ते मृत्यूपर्यंत नेतृत्व केले.
मराठी कुटुंबात जन्मलेले नरेंद्रकुमार प्रसादराव साळवे उर्फ एन. के. पी. साळवे केंद्रात मंत्री होते. तसेच, भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष म्हणून 1982 ते 1985 दरम्यान काम केले आहे.
मूळचे मराठी असलेले माजी केंद्रीय मंत्री (स्व) माधवराव शिंदे हे भारतीय क्रिकेट मंडळाचे 1990 ते 1993 मध्ये अध्यक्ष होते.
ज्येष्ठ नेते शरद पवार हे दोन वेळा मुंबई क्रिकेट प्रमुख होते. ते 2001 ते 2010 आणि 2013 ते 2017 या कालावधीत त्यांनी एमसीएचे अध्यक्षपद भूषविले. ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, आशिया क्रिकेट मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचेही अध्यक्ष होते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे 1992 ते 2001 पर्यंत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते.
शरद पवार यांच्यानंतर विलासराव देशमुख यांनीही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रमुखपद सांभाळले आहे. मात्र, त्यांना जुलै 2011 ते 14 ऑगस्ट 2012 एवढाच कालावधी मिळाला.
भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार हेही जवळपास एक वर्षे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख होते. सध्या ते भारतीय क्रिकेट मंडळाचे कोषाध्यक्ष आहेत
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे सध्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिशनचे अध्यक्ष आहे.