सरकारनामा ब्यूरो
समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेशातील खासदार प्रिया सरोज या प्रसिध्द क्रिकेटर रिंकू सिंगसोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.
रिंकू सिंगची भावी पत्नी काय करते त्यांची आणि त्याच्या वडिलांची एकूण संपत्ती किती आहे, हे जाणून घेऊयात...
2024 लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक प्रतिज्ञापत्रात प्रिया सरोज यांची एकूण संपत्ती 11लाख 25 हजार 719 रुपये आहे. तर त्यापैकी 10 लाख 10 हजार रुपये युनियन बँकेत जमा आहेत.
प्रिया यांचे वडील तूफानी सरोज समाजवादी पक्षाचे मोठे नेते असून तीनदा लोकसभेचे खासदार होते.
तूफानी सरोज यांची एकूण मालमत्ता 6.55 कोटी इतकी आहे. त्यांच्याकडे 80 हजार रुपये रोकड असून 46 लाख बँकेत जमा आहेत.
तुफानी सरोज यांची 15 लाख रुपयांची LIC पॉलिसी आहे. तर त्यांच्या नावावर स्विफ्ट आणि ट्रॅक्टर अशी वाहने असून त्यांची किंमत 31 लाख रुपये इतकी आहे.
तुफानी सरोज यांच्या पत्नीकडे 30 हजार रुपयांची रोकड असून तुफानी यांच्याकडे 40 ग्रॅम तर पत्नीकडे 60 ग्रॅम दागिने आहेत.