Deepak Kulkarni
क्रिकेटच्या कसोटी, वनडे, T20 आणि आयपीएल अशा सर्वच मैदानावर भल्या भल्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवणारा युजवेंद्र चहल सर्वांना माहिती आहे.
चहलने 2 ऑक्टोबर 2026 रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, त्याने एकदिवसीय आणि टी-20 या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचं स्पष्ट केलं आहे.
युजवेंद्रने 2009 मध्ये हरियाणामधून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 49 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्यांनी 148 बळी घेतले आहेत.
त्याने आत्तापर्यंत 72 वनडे आणि 80 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यानंतर त्याची भारतीय संघात निवड झालेली नाही. तरीही चहलने पुनरागमनाची आशा सोडलेली नाही.
क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर आता क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने आता नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत आहे.
भारतीय क्रिकेटपटून युजवेंद्र चहलने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचा संसार काय फार काळ टिकला नाही. 20 मार्च 2025 रोजी मुंबईतील वांद्रे कुटुंब न्यायालयात अधिकृतपणे घटस्फोट झाला
यानंतर युजवेंद्र चहल आणि आरजे महावशला डेट करत असल्याचं समोर येत आहे. त्या दोघांना एकत्र पाहिलं आहे.
भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्याला ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 'विशेष निमंत्रित सदस्य' म्हणून स्थान देण्यात आले आहेत.