Rashmi Mane
नागपूर हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय वातावरण तापलेले असतांनाही प्रचंड थंडीतही मंत्री, आमदार, त्यांच्या कार्यकर्त्यांची 'क्रिकेटनामा'च्या कार्यक्रमाला हजेरी...
नागपूर अधिवेशनाच्यानिमित्त 'सकाळ माध्यम समूहा'च्या 'सरकारनामा'च्या वतीने पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी, श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंडवर येथे 'क्रिकेट' स्पर्धा आयोजित केली होती.
'क्रिकेटनामा'चा अंतिम सामना काँग्रेस वॉरियर्स आणि शिवसेना रायडर्स (एकनाथ शिंदे गट) यांच्यात रंगला.
काँग्रेस वॉरियर्सचे खेळाडू आमदार झिशान सिद्दीकी आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या पितापुत्रांच्या अष्टपैलू खेळीने क्रिकेटनामा स्पर्धा गाजवली.
काँग्रेसच्या खेळाडूंची जबरदस्त फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आलं कामाला.
काँग्रेसच्या विजयानंतर टाळ्या, शिट्ट्या, पिपाण्यांचा आवाजात डान्स करत मैदानावर जल्लोष साजरा करण्यात आला.
क्षेत्ररक्षण, फलंदाजी, टोलेबाजी, झेल, स्टपिंग, धावबाद, षटकार, चौकार अशा शब्दांचा आवाज मैदानात सतत घुमत होता.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आणि स्पर्धेचे निमंत्रक तथा माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते विजेत्या संघाचा ‘क्रिकेटनामा’ चषक प्रदान करण्यात आला.