Rashmi Mane
सकाळ माध्यम समूहाच्या ‘सरकारनामा’ आयोजित ‘क्रिकेटनामा’ गाजला मंत्री, आमदारांच्या उपस्थितीने.
आतापर्यंत असा उपक्रम कधीही विदर्भात झालेला नव्हता.
या उपक्रमात महाराष्ट्रभरातील दिग्गज नेते मंडळींनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
नागपूर शहरातील मेकोसाबाग परिसरात असलेल्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी, मेथोडीस्ट हायस्कूलच्या प्ले-ग्राऊंड, श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंड परिसरात ‘क्रिकेटनामा’चे सोमवारी (11 डिसेंबरला ) थाटात उद्घाटन झाले.
या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला भाजपचे माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, भाजप आमदार आमदार वसंत खंडेलवाल, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख तसेच कौशल्य,रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपुरात 'क्रिकेटनामा'चा दुसरा सीझन पार पडला.
अलीकडच्या काळातील राजकीय परिस्थिती पाहता नेत्यांमधील खिलाडूवृत्तीचं महाराष्ट्राला दर्शन घडविणं गरजेचं होतं, त्यामुळे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या दहा टीम क्रिकेटनामा स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.
या स्पर्धेत खेळण्यासाठीचा नेते मंडळींचा उत्साह वाखाळण्याजोगा होता.