Rashmi Mane
सरकारनामा आयोजित 'क्रिकेटनामा'च्या कार्यक्रमात... मैदानावर मंत्री, आमदार, त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली जोरदार एन्ट्री..
जर्सी घालून मैदानात उतरताच सुरू झालेले डावपेच क्रिकेटच्या मैदानात खेळले गेले.
दोन दिवस चाललेल्या क्रिकेटनामात आमदार आणि त्यांचे पदाधिकारी सुखावल्याचे चित्र दिसून आले.
अधिवेशनाच्या या काळातच 'सकाळ माध्यम समूहा'च्या 'सरकारनामा'कडून श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंडवरील पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी येथे 'क्रिकेटनामा' पार पडला.
या संघांमध्ये मैदानात घमासान झाली. जिंकण्यासाठी मैदानात उतरताच डावपेच टाकले जात होते.
अंतिम सामन्यासाठी प्रेक्षक उत्साही होते. खेळाडूंचा उत्साह वाढण्यासाठी टाळ्या, शिट्या, पिपाण्या वाजवून दाद देण्यात आली.
क्षेत्ररक्षण, फलंदाजी, टोलेबाजी, झेल, स्टपिंग, धावबाद, षटकार, चौकार अशा शब्दांच्या आवाज मैदानात सतत घुमत होता.
आमदारांच्या चोकार अन् षटकारांनी क्रिकेटनामा चांगलाच गाजला.