Rashmi Mane
आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे, जे केवळ तुमची ओळख आणि नागरिकत्वाचा पुरावा नाही तर शाळेत प्रवेश घेण्यासाठी आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आवश्यक आहे.
त्यामुळेच तुमची माहिती अपडेट करणे खूप महत्वाचे आहे. याबद्दल UIDAIने अलर्ट जाहीर केला आहे. मुलांच्या आधार कार्डसाठी म्हणजेच बाल आधारसाठी हा अलर्ट जारी केला आहे.
5 ते 7 वर्षे वयोगटातील मुलांच्या आधार कार्डचे बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे, हे काम सध्या पूर्णपणे मोफत करता येईल.
बाल आधार हे 5 वर्षांपर्यंत बायोमेट्रिकशिवाय दिले जाते. पण 5 वर्षांनंतर बायोमेट्रिक अपडेट करणे अनिवार्य आहे.
जर बायोमेट्रिक अपडेट 7 वर्षांपूर्वी केले नाही, तर आधार कार्ड निष्क्रिय होऊ शकते आणि लाभ मिळणार नाहीत.
शाळा प्रवेश
प्रवेश परीक्षा
शिष्यवृत्ती
DBT फायदे
हे सर्व फायदे थांबू शकतात!
7 वर्षांनंतर जर बायोमेट्रिक अपडेट कराल, तर त्यासाठी 100 रुपये शुल्क भरावे लागेल.