Crop Damage Survey : अतिवृष्टी, महापुरानंतर शेतीचे पंचनामे कसे होतात? काय असतात नोंदी?

Rashmi Mane

अतिवृष्टी

गेल्या काही दिवसांत राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Flood crop damage assessment | Sarkarnama

मदतीची अपेक्षा

पिकांचे, घरांचे तसेच जनावरांचेही नुकसान झाल्याने शासनाकडे मदतीची अपेक्षा आहे. अशावेळी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पंचनाम्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरते.

Flood crop damage assessment | Sarkarnama

पंचनामा म्हणजे काय?

पंचनामा म्हणजे झालेल्या नुकसानीची अधिकृत नोंद. महसूल विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतात.

Flood crop damage assessment

भरपाईसाठी आधार

किती नुकसान झाले आहे याची माहिती कागदोपत्री करतात. हाच पंचनामा पुढे शासनाकडे भरपाईसाठी आधार म्हणून दिला जातो.

Flood crop damage assessment

पंचनामा कसा होतो?

अतिवृष्टी किंवा पुरानंतर संबंधित गावातील तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक असे अधिकारी गावात भेट देतात. शेतात उभ्या पिकांचे नुकसान किती झाले आहे, शेतजमिनीवर गाळ बसला आहे का, घरांचे किंवा मालमत्तेचे नुकसान झाले आहे का, याची पाहणी केली जाते.

Flood crop damage assessment | Sarkarnama

माहिती गोळा केली जाते

शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची माहिती घेतली जाते. त्यानंतर पंचनाम्यात पीकाचे नाव, टक्केवारीत नुकसान, क्षेत्रफळ, शेतकऱ्याचे नाव, सर्वे नंबर अशा नोंदी केल्या जातात.

Flood crop damage assessment | Sarkarnama

नोंदीत काय असते?

पंचनाम्यात शेतकऱ्याचे संपूर्ण तपशील, जमिनीचा आकार, पीक कोणते होते, त्याची किती टक्के हानी झाली, घर अथवा जनावरांचे नुकसान झाले का, हे सर्व स्पष्टपणे लिहिले जाते. अधिकारी फोटो आणि व्हिडिओद्वारेही पुरावे जतन करतात.

Flood crop damage assessment | Sarkarnama

अहवाल सादर होतो

यानंतर हा पंचनामा तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला जातो. जिल्हा प्रशासन शासनाला अहवाल सादर करते आणि त्यावरून मदत जाहीर केली जाते. नुकसानाचे प्रमाण अधिक असल्यास शासन विशेष मदत पॅकेज देऊ शकते.

Flood crop damage assessment | Sarkarnama

आर्थिक मदत

शेतकऱ्यांसाठी पंचनामा ही प्रक्रिया महत्त्वाची आहे कारण त्यावरच त्यांना मिळणारी आर्थिक मदत ही आधार ठरते.

Flood crop damage assessment | Sarkarnama

 Next : मुख्यमंत्री सहायता निधी म्हणजे काय तो कसा मिळवाल अन् कोणाला मिळतो

येथे क्लिक करा