Pradeep Pendhare
राज्यात पूरस्थिती असून, पूरग्रस्तांकडून सरकारकडे मागणीचा ओघ वाढला आहे.
राज्यातील पूरस्थितीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी चर्चेत आहे. हा निधी कोणाला मिळतो हे समजावून घेऊ या!
राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक संस्था अन् दानशूर व्यक्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीला फंड देत आहेत.
गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना आपत्कालीन परिस्थितीत, विशेषतः नैसर्गिक आपत्ती, गंभीर आजार किंवा अपघाताग्रस्तांना आर्थिक मदत मिळते.
या निधीचा वापर महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी, तसेच पूर, दुष्काळ, आग किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या व्यक्तींना तात्काळ मदतीसाठी केला जातो.
वैद्यकीय मदत, आपत्कालीन मदत अन् दुर्घटनाग्रस्तांना सहाय्य करणे या निधीचा उद्देश आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या निधीचे प्रमुख असतात. मुख्यमंत्र्यांचे सचिव या निधीचे मानद सचिव म्हणून काम पाहतात आणि त्यांना आवश्यक ते अधिकारी मदत करतात.
या निधीतून मदतीसाठी अर्ज प्रक्रिया राबवली जाते, ज्यामध्ये गरजू रुग्णांना आणि आपत्तीग्रस्त लोकांना अर्ज करावा लागतो.
ज्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा इतर आरोग्य योजनांचा लाभ मिळत नाही, अशा गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत मदत पुरवली जाते.