Rashmi Mane
केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) हे देशातील सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पोलिसांच्या कार्यात मदत करणे ही 'सीआरपीएफ'चे मुख्य काम आहे.
'सीआरपीएफ'चे जवान देशातल्या सर्वात मोठ्या सशस्त्र पोलिस दलाचा भाग बनून देशाची सेवा करतात.
तुम्हाला माहीत आहे का CRPF जवानांचा पगार किती असतो ?
'सीआरपीएफ' उमेदवारांना 21,700 ते 69,100/- रुपये वेतनश्रेणी दिली जाते.
केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) कॉन्स्टेबल म्हणून सामील होणार्या उमेदवारांना त्यांच्या ग्रेड पे 2000 सह भत्ते मिळतात.
नव्याने नियुक्त झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना पोस्टिंगच्या जागेनुसार रु. 30 हजार ते 35 हजार पगार मिळतो.