Rashmi Mane
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने महागाई भत्त्यात (DA) 2 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.
महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्क्यांवर गेला आहे. या वाढीसाठी तब्बल 1,700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लागू करण्याचे धोरण राज्य सरकारने अवलंबले आहे
या धोरणानुसार वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात वाढ केली जाते. याआधी 1 जानेवारी 2025 रोजी 2 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.
त्यानंतर आता जुलै महिन्यापासून पुन्हा 2 टक्क्यांनी वाढ लागू करण्यात आली आहे.
महागाई भत्त्याची ही वाढ सहा महिन्यांच्या कालावधीतील थकीत रक्कमेसह कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. वाढीव महागाई भत्ता ऑगस्ट महिन्याच्या पगारात समाविष्ट केला जाईल.
लाखो कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे. राज्यात सध्या अंदाजे 12 लाख सरकारी कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या पगारात वाढ होणार आहे.
विशेष म्हणजे, गणेशोत्सवाआधीच कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल.