Rashmi Mane
आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अग्निशमन विभागात तब्बल 1773 पदांची मेगा भरती जाहीर झाली आहे.
अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीमुळे ठाणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे निर्माण झाली होती.
मंजूर 300 पदांपैकी 166 पदे रिक्त
कनिष्ठ अभियंता (नागरी) – 24 पदे
कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) – 16 पदे
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 4 पदे
कनिष्ठ अभियंता-2 – 63 पदे
आरोग्य विभागात तब्बल 65 प्रकारच्या पदांसाठी भरती होणार आहे. यात परिचारिका 457, प्रसाविका 117, वॉर्ड बॉय 37, ज्युनिअर टेक्निशियन 60, दवाखाना आया 48, मॉरच्युरी अटेंडन्ट 28, शस्त्रक्रिया सहाय्यक 25, मल्टिपर्पज वर्कर 33 यांचा समावेश आहे.
तसेच सहाय्यक क्ष-किरण तंत्रज्ञ, लॅब अटेंडन्ट, ब्लड बँक टेक्निशिअन, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर, डायटीशियन, लिपीक, सहाय्यक परवाना निरीक्षक आदी पदेदेखील भरण्यात येणार आहेत
2011 च्या जनगणनेनुसार ठाणे महापालिकेची लोकसंख्या 18.41 लाख होती, जी आता 25 लाखांवर पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य, सुरक्षाव्यवस्था आणि पायाभूत सुविधांवर प्रचंड दबाव वाढला आहे
राज्य सरकारने यापूर्वीच 880 नवीन पदांना मंजुरी दिली होती, मात्र त्यांची भरती होऊ शकली नव्हती. आता या मेगा भरतीमुळे विभागांवरील ताण कमी होऊन नागरिकांना अधिक चांगल्या सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.