Mangesh Mahale
मुंबईकरांची भुक भागवणाऱ्या डेबवाल्यांचा मुलगा चक्क मुंबई महापालिकेत बसणार आहे.
मावळ तालुक्यातील पारिठेवाडी अंदर मावळ गावातील एका डबेवाल्याचा मुलगा मंगेश पागारे शिवसेनेचा नगरसेवक झाला आहे.
कोणतीही राजकीय बॅगराउंड नसताना त्याने हे यश मिळवलं असून तो आता मुंबई महानगरपालिकेत जाणार आहे.
मंगेश यांचे वडील दत्ताराम यांनी आयुष्यभर मुंबईकरांना वेळेवर जेवण पोहोचवण्याचे काम केलं. आज त्यांचा मुलगा मुंबईच्या कारभारात सहभागी होणार आहे.
निकाल जाहीर होताच निवडणूक केंद्राबाहेर शेकडो डबेवाल्यांनी एकत्र येत पांढऱ्या टोप्या हवेत उडवून आणि गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला.
"आज आमच्या घरातला पोरगा नगरसेवक झाला," अशी भावना यावेळी अनेक डबेवाल्यांनी व्यक्त केली.
विजयानंतर मंगेश पांगारे यांनी आपल्या वडिलांच्या चरणी नतमस्तक होत हा विजय मुंबईच्या कष्टकऱ्यांचा असल्याचे सांगितले.