Mangesh Mahale
उद्धव-राज ठाकरे एकत्र आल्यानंतरही मुंबई महापालिकेतील 25 वर्षांपासूनची सत्ता हातातून गेली. उद्धव ठाकरे यांना 66 तर राज ठाकरे यांना 6 जागा मिळाल्या आहेत.
आशियातील सर्वात श्रीमंत नगरी मुंबईत आता मराठी मते काही खास प्रभाव दाखवणारी ठरली नाहीत.
ठाकरे बंधू यापूर्वीत एकत्र आले असते तर दोघांना जनाधार मिळाला असता. ते 20 वर्षांनी एकत्र आले.
विधानसभेत महाविकास आघाडीमुळे मुंबईत शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या. राज-उद्धव एकत्र आल्याने परप्रांतीय मते राखता आली नाही. काँग्रेसने वंचितशी युती करणे पसंत केले.
राज यांनी मस्जिदवरील लाऊड स्पिकरच्या मुद्यावरुन रान पेटवले होते. त्यामुळे २० टक्के मुस्लीम मतदार नाराज झाले.
मुंबईत २२% उत्तर भारतीय, २०% मुस्लीम आणि १८ % गुजराती,मारवाडी आहेत. यांची संख्या मुंबईच्या विजयात महत्वाची होती.
मुंबईत मराठी मतदार हा ३५ टक्के आहे. त्यावर ठाकरेंना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. उर्वरित ६५ टक्के लोक मनसेच्या परप्रांतीय धोरणामुळे नाराज होते.
सिंगल बास्केट ब्लंडर अशी इंग्रजीत एक म्हण आहे की सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नये. त्याकडे दुर्लक्ष करीत ठाकरेंनी संपूर्ण मदार मराठी मतदारांवर केंद्रीत केली.
उत्तर भारतीय तर आधीच राजवर नाराज आहेत. मराठी अस्मितेचा मुद्दा प्रचारात वापरण्याचा प्रयत्न केले. महायुतीने विकासाच्या मुद्यांवर मते मागितली.