Dada Bhuse On CBSE Pattern: शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेंनी घोषणा केलेल्या 'सीबीएसई' पॅटर्नची A to Z माहिती

Deepak Kulkarni

सीबीएससी पॅटर्न लागू

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात आला आहे. 

CBSE Pattern | Sarkarnama

शाळांना सूचना

याबाबत राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत.

CBSE Pattern | Sarkarnama

यावर्षी फक्त इयत्ता पहिलासाठी

शैक्षणिक वर्ष 2025-2026 या वर्षांपासून सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात येणार असून यावर्षी फक्त इयत्ता पहिलासाठी हा पॅटर्न लागू होणार आहे. 

CBSE Pattern | Sarkarnama

या विद्यार्थ्यांसाठी सीबीएससी पॅटर्न

पुढच्या वर्षात दोन टप्प्यांत आपण दुसरी, तिसरी, चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएससी पॅटर्न लागू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

CBSE Pattern | Sarkarnama

कुठलीही फी वाढ होणार नाही...

राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात माहिती देतानाच त्यांंनी सीबीएससी पॅटर्न लागू केल्याने शाळांमध्ये कुठलीही फी वाढ होणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.

Dada bhuse | Sarkarnama

शिक्षणमंत्र्यांकडून विधानपरिषद सभागृहात माहिती...

राज्यात शाळांसाठी सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम स्वीकारण्याबाबत व त्याच्या अंमलबजावणीबाबत शालेय शिक्षण मंत्र्यांकडून विधानपरिषद सभागृहात लेखी उत्तर देण्यात आले.

CBSE Pattern | Sarkarnama

सुकाणू समितीसोबत चर्चा

यासंदर्भात सुकाणू समितीसोबत चर्चा करुन झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचंही भुसे यांनी सांगितलं.

CBSE Pattern | Sarkarnama

1 एप्रिलपासून सत्राची सुरुवात

सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करुन दिली जाणार असून 1 एप्रिलपासून सत्राची सुरुवात करण्यात येणार असल्याचेही भुसे यांनी यावेळी माहिती दिली आहे.

CBSE Pattern | Sarkarnama

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ठोस पावले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत, अशा सूचना दिल्या होत्या. राज्यातील शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न लागू करण्यासाठी आवश्यक ते बदल करावेत, असेही निर्देश दिले होते. 

Dada Bhuse on CBSE Pattern | Sarkarnama

NEXT : पंतप्रधान मोदींना ‘गुड फ्रेंड’ म्हणणाऱ्या मेलोनी अडचणीत; काय घडलं?

Giorgia Meloni | Sarkarnama
येथे क्लिक करा...