Rajanand More
जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पंतप्रधान आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख त्या ‘गुड फ्रेंड’ असा करतात.
एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला तुरुंगातून बेकायदेशीरपणे सोडल्याचा आरोप मेलोनी यांच्या सरकारवर करण्यात आला आहे.
या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून सरकारविरोधात पुरावे सापडल्यास मेलोनी यांना पदावरून पायउतार व्हावे लागू शकते.
जानेवारी महिन्यात लिबियातील वाँटेड गुन्हेगार अल मसरी नजीमला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयानेही वॉरंट जारी केले होते.
सरकारमधील मंत्र्यांनी नियमांचे पालन करता नजीमला 48 तासांत सोडून दिले. इटलीतून बाहेर जाण्यासाठी सरकारी विमान दिले, असा आरोप करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या घटनेची गांभीर्याने दखल घेत घेतली असून चौकशी सुरू केली आहे. त्याचे पडसात इटलीच्या राजकारणातही उमटत आहेत.
लीबियामध्ये सामूहिक हत्याकांडामध्ये नजीमचा हात आहे. मोहम्मद गद्दाफीच्या सत्तांतरावेळी हे हत्याकांड झाले होते. महिला व मुलींवर बलात्काराचा आरोपही आहे.
नजीमला स्थानिक तपास यंत्रणांकडून अटक करण्यात आली होती. पण तुरुंग फोडून पसार झाला होता. तो इटलीमध्ये होता. आता त्याने इथूनही पलायन केले आहे.