Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ : अजित पवार

Vijaykumar Dudhale

देवळाली प्रवरा येथे जन्म

अजित पवार यांचा जन्म नगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे 22 जुलै 1959 रोजी झाला.

Ajit Pawar | Sarkarnama

बी.कॉमपर्यंत शिक्षण

अजितदादांचे शिक्षण बी.कॉमपर्यंत झाले असून पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत घेतल्यानंतर ते पुन्हा बारामतीला परतले.

Ajit Pawar | Sarkarnama

राजकीय इनिंग

अजित पवार यांच्या राजकीय इनिंगची सुरुवात इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदापासून झाली. ते 1982 मध्ये छत्रपती साखर कारखान्याचे संचालक बनले होते.

Ajit Pawar | Sarkarnama

पुणे जिल्हा बॅंकेचे 16 वर्षे अध्यक्ष

मार्च 1991 मध्ये ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष झाले. तब्बल 16 वर्षे ते या पदावर होते.

Ajit Pawar | Sarkarnama

प्रथम खासदार मग आमदार

बारामती लोकसभा मतदारसंघाची अजित पवार यांनी जून 1991 मध्ये निवडणूक लढवली. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी त्यांनी सप्टेंबर 1991 मध्ये खासदारकीचा राजीनामा दिला.

Ajit Pawar | Sarkarnama

बारामतीतून सातव्यांदा विधानसभेत

बारामती विधानसभा मतदारसंघातून 1991 पासून ते 2019 पर्यंत निवडणूक सात वेळा उच्चांकी मतांनी निवडून येत आहेत. सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे 1991 ते 1993 या दरम्यान राज्यमंत्री होते.

Ajit Pawar | Sarkarnama

सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री

विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री बनले. अजित पवार हे 2010 मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री बनले. सर्वाधिक वेळा ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. सध्या ते पाचव्यांदा उपमुख्यमंत्री आहेत.

Ajit Pawar | Sarkarnama

शरद पवार यांच्याविरोधात बंड

अजित पवार यांनी 2023 मध्ये आपले काका शरद पवार यांच्याविरोधात बंड करत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. सध्या या पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

Ajit Pawar | Sarkarnama

प्लेसमेंट नाकारुन युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट झाल्या IAS !

IAS Disha Srivastava | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा