Dadar kabutarkhana : कबुतरांनी मुंबईचं राजकारण तापवलं; पण विरोध का? कोणते आजार होतात?

Rashmi Mane

कबुतरांची गुटरगू… पण फुफ्फुसावर घाला!

शहराचा विस्तार, वृक्षतोड आणि मोठं मोठ्या इमारतीमुळे कबुतरांनी आपले घरटे बदलले. आता ते खिडक्या, बाल्कनी आणि एसीच्या आउटलेटवर बस्तान मांडतात.

Dadar kabutarkhana | Sarkarnama

श्वसनाचा धोका

कबुतरांची विष्ठा वाळल्यानंतर तिचे सूक्ष्म कणविष्ठेत आढळणारी बुरशी हवेत मिसळतात. हे कण घरातील लोकांच्या फुफ्फुसात जाऊन श्वसनाचे विकार निर्माण करू शकतात.

Dadar kabutarkhana | Sarkarnama

विष्ठेत आढळणारी बुरशी

कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस आणि क्रायटोकॉकस या बुरशीचे प्रकार असतात. हे बुरशीचे कण माती किंवा हवेतून शरीरात जाऊ शकतात.

Dadar kabutarkhana | Sarkarnama

आजारांची शक्यता

या बुरशीमुळे दमा, अलर्जीक राइनाइटिस, डोळ्यांची जळजळ, त्वचेची अॅलर्जी आणि फुफ्फुसातील संसर्ग होऊ शकतो. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना अधिक धोका असतो.

Dadar kabutarkhana | Sarkarnama

लहान मुलांवरील परिणाम

कबुतरांच्या जवळ खेळणाऱ्या मुलांना लवकर संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना कबुतरांपासून आणि त्यांच्या विष्ठेपासून दूर ठेवणे आवश्यक आहे.

Dadar kabutarkhana | Sarkarnama

टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी

संसर्ग टाळण्यासाठी पक्ष्यांच्या विष्ठेशी थेट संपर्क टाळा, संपर्क आल्यास ताबडतोब हात धुवा, खाण्यापूर्वी हात तोंडाजवळ नेऊ नका आणि दाणे दिल्यास हात स्वच्छ करा.

Dadar kabutarkhana | Sarkarnama

वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

श्वसनविकारतज्ज्ञांचा आग्रह आहे की कबुतरांना दाणे टाकू नका. कबुतरांपासून दूर राहणे ही सवय तुमच्या आरोग्याला आणि श्वसनमार्गाला सुरक्षित ठेवेल.

Dadar kabutarkhana | Sarkarnama

उशीर नका करू

वेळीच निदान व उपचार न झाल्यास हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया, फुफ्फुसांची सूज आणि गंभीर श्वसनमार्गाचे आजार होऊ शकतात. सावध राहा आणि आरोग्याचे रक्षण करा.

Dadar kabutarkhana | Sarkarnama

Next : EPFO चा नवा नियम: आता केवळ 'या' अ‍ॅपवरूनच मिळेल UAN नंबर!

येथे क्लिक करा