Rashmi Mane
1 ऑगस्ट 2025 पासून EPFO ने UAN (Universal Account Number) तयार करण्याची पद्धत बदलली आहे. आता फक्त UMANG अॅपद्वारे फेस ऑथेंटिकेशननेच UAN मिळणार!
UAN म्हणजे कर्मचारी भविष्य निधी खात्याचा यूनिव्हर्सल अकाउंट नंबर. EPFO प्रत्येक कर्मचाऱ्याला हा नंबर देतो.
UAN मुळे कर्मचारी कितीही वेळा नोकरी बदलली तरी त्यांच्या सर्व PF खाती एकाच UAN अंतर्गत लिंक होतात.
1 ऑगस्ट 2025 पासून नवीन UAN फक्त UMANG अॅपवरून आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन वापरूनच जनरेट केला जाईल
फेस ऑथेंटिकेशन ही एक डिजिटल पद्धत आहे, ज्यामध्ये तुमचा चेहरा ओळखून तुमची ओळख निश्चित केली जाते.
EPFO चा उद्देश म्हणजे UAN जनरेशन प्रक्रिया अधिक अचूक, ऑटोमेटेड आणि विश्वासार्ह बनवणे.
UMANG अॅप हे केंद्र सरकारचे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे EPFO सह अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत.
नवीन कर्मचाऱ्यांना आता नोकरी मिळाल्यानंतर स्वतःच्या फेस स्कॅन करून UAN जनरेट करावा लागेल.