Mangesh Mahale
दादरमधील एका मराठी मुलाने ब्रिटनमध्ये इतिहास घडवला आहे. डॉ. नितीश राऊत ‘रॉयल टाऊन ऑफ सटन कोल्डफिल्ड’चे महापौर बनले आहेत.
ब्रिटनमधील बर्मिंगहॅमजवळ वसलेल्या ‘रॉयल टाऊन ऑफ सटन कोल्डफिल्ड’ या ऐतिहासिक शहराच्या महापौरपदी त्यांची २०२६-२७ वर्षासाठी निवड झाली आहे
डॉ. मूळचे मुंबईतील दादर पश्चिम येथील रहिवासी. त्यांचे बालपण अगदी सामान्य मराठी कुटुंबात गेले आहे.
१९९४ मध्ये त्यांनी मुंबईतील जे. जे. मेडिकल कॉलेजमध्ये ‘एमबीबीएस’ शिक्षण पूर्ण केले. २००५ मध्ये पुढील शिक्षणासाठी त्यांनी ब्रिटन गाठले.
शीव मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम केले. शिक्षण, शिस्त आणि समाजासाठी काम करण्याची वृत्ती यामुळे त्यांची ओळख वेगळी निर्माण झाली.
‘सटन कोल्डफिल्ड’चे ते पहिले भारतीय वंशाचे महापौर, वेस्ट मिडलँड्स भागातील पहिले हिंदू महापौर आणि ब्रिटनमधील पहिले मराठी महापौर मानले जात आहेत.
लोकांमध्ये राहून केलेल्या कामामुळे त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत गेला. ते सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले.
जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेला तरी मराठी माणूस आपली वेगळी छाप सोडू शकतो, हे डॉ. नितीश राऊत यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.