Mangesh Mahale
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना २०२२ मध्ये ED ने अटक केली. दाऊद इब्राहिमशी संबंधित जमीन व्यवहार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे ते चर्चेत आले होते.
पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ED ने मोठी कारवाई केली. त्यांच्या अटकेनंतर राज्यात जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला.
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ED चौकशीला सामोरं जावं लागलं. त्यांना काही काळ तुरुंगवासही भोगावा लागला.
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयांवर ED ने छापेमारी केली होती. आर्थिक व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग संदर्भात चौकशी करण्यात आली.
दापोलीतील कथित रिसॉर्ट प्रकरणामुळे शिवसेना नेते अनिल परब EDच्या रडारवर आले. जमीन व्यवहार आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवरून चौकशी झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर ED ने छापे टाकले. साखर कारखाना आणि आर्थिक व्यवहारांबाबत चौकशी झाली होती.
शिवसेना नेत्या भावना गवळी यांच्या संस्थांवर आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून EDने कारवाई केली होती. त्यांच्या निकटवर्तीयांना अटक करण्यात आली होती.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांमुळे ED आणि आयकर विभाग सक्रिय झाले होते.
भोसरी जमीन व्यवहार प्रकरणामुळे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही ED चौकशीला सामोरं जावं लागलं. या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा निर्माण केली होती.