Dahi Handi 2024 : मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात 'थर'थराट!

Pradeep Pendhare

1354 दहीहंडी

ठाणे जिल्ह्यात 1,354 दहीहंड्या फुटतील. यात 1,093 खासगी, तर 261 सार्वजनिक दहीहंडी असतील.

Dahi Handi 2024 | Sarkarnama

91 मिरवणुका

कृष्णजन्माष्टमीनिमित्ताने ठाणे जिल्ह्यातील 154 ठिकाणी जन्माष्टमीचा सोहळा, तर विविध परिसरातून 91 मिरवणुका काढण्यात येतील.

Dahi Handi 2024 | Sarkarnama

तरुणांचा सराव

तरुणाईच्या उत्साहाने भरलेला दहीहंडी उत्सवामुळे ठाणे शहरात ठिकठिकाण गोविंदा पथके रात्रभर जागरण करून मानवी थरांचा सराव करत आहेत.

Dahi Handi 2024 | Sarkarnama

आनंद दिघेंची आठवण

ठाणे शहरातील दिवंगत नेते शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी टेंभीनाका येथे दहीहंडीचे आयोजन करून शहरातील सर्व गोविंदा पथकांचे लक्ष वेधले होते.

Dahi Handi 2024 | Sarkarnama

लाखो रुपयांची बक्षिसे

विविध राजकीय पक्ष आणि मंडळांच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणात गोपाळकाला हा सण साजरा केला जात आहे. दहीहंडी थरांचा विक्रम रचणाऱ्यांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे लावली जातात.

Dahi Handi 2024 | Sarkarnama

लक्षवेधी उत्सव

वर्तकनगर, टेंभीनाका, रहेजा गार्डन, भगवती मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहीहंड्यांचे आयोजन केले जाते. यासाठी मुंबईतील पथकांची चढाओढ असते.

Dahi Handi 2024 | Sarkarnama

जन्माष्टमीचे आयोजन

ठाणे 18, भिवंडी 29, कल्याण 43, उल्हासनगर 23, वागळे इस्टेट 41 या ठिकाणी जन्माष्टमीचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण, भिवंडी, वागळे इस्टेट, उल्हासनगरमध्येही दहीहंडी बांधल्या जातात.

Dahi Handi 2024 | Sarkarnama

NEXT : उद्धव ठाकरे ते शरद पवार, भरपावसात बदलापूर प्रकरणी 'मविआ'चं काळ्या फिती लावून आंदोलन; पाहा PHOTOS

येथे क्लिक करा :