Rashmi Mane
बदलापूर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुण्यात भर पावसात महाविकास आघाडीचं निषेध आंदोलन केले. तोंडाला काळी फीत लावून नेते, कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी झाले आहेत.
उद्धव ठाकरेंचेही भर पावसात निषेध आंदोलन सुरु आहे. यावेळी आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनीही सहभाग घेतला आहे.
अत्याचाराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून सरकारविरोधात आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले त्यामुळे हा बंद मागे घेण्यात आला.
लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी आमचा लढा सुरूच राहणार! असं म्हणत उद्धव ठाकरेंचे भर पावसात निषेध आंदोलन शिवसेना भवन, दादर येथे सुरु आहे.
'सरकार निर्लज्जपणे वागतंय, ह्या सरकारला घालवावंच लागेल'; आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
बदलापुरातील चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे.
काँग्रेस विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनीही संगमनेर इथे आंदोलन केले आहे. राज्यभरात महाविकास आघाडीकडून हातात काळे झेंडे घेऊन, तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध आंदोलन सुरु आहे.