Dahi Handi 2025 : गोविंदा रे गोपाळा! मुंबई, ठाण्यातील 'या' आहेत प्रसिद्ध राजकीय दहीहंड्या

Rashmi Mane

दहीहंडी उत्सव

देशभरात येत्या 16 ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा होणार असून मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात यंदाही उत्साहाचे वातावरण असणार आहे.

Dahi Handi 2025 | Sarkarnama

मुंबईचा दहीहंडी जल्लोष

"गोंविदा रे गोपाळा","अरे बोल बजरंग बली की जय”च्या घोषात बालगोपाल मानवी पिरॅमिड रचून मानाच्या हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Dahi Handi 2025 | Sarkarnama

मुंबई-ठाण्यातील मानाच्या पाच दहीहंड्या

संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी, ठाणे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने ठाण्यातील वर्तकनगर शाळा परिसरात उभारल्या जाणाऱ्या या मानाच्या हंडीची 2012 मध्ये ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली होती.

Dahi Handi 2025 | Sarkarnama

वांद्रे कॉलनी दहीहंडी

भाजपचे आमदार आशीष शेलार यांच्या पुढाकाराने होणारी ही दहीहंडी मुंबईतील सर्वांत लक्षवेधी मानली जाते. अनेक मान्यवर पथकांना खास आमंत्रण दिले जाते आणि इथे बघ्यांची मोठी गर्दी जमते.

Dahi Handi 2025 | Sarkarnama

टेंभी नाका हंडी, ठाणे

शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारली जाणारी ‘दिघे साहेबांची मानाची हंडी’ ठाण्यात विशेष प्रसिद्ध आहे. ही हंडी ठाण्याच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे.

Dahi Handi 2025 | Sarkarnama

राम कदम दहीहंडी, घाटकोपर

भाजप आमदार राम कदम यांनी यंदा पुन्हा एकदा भारतातील सर्वात मोठी दहीहंडी उभारण्याचा दावा केला आहे. बक्षीस रक्कम अद्याप जाहीर झालेली नाही.

Dahi Handi 2025 | Sarkarnama

जितेंद्र आव्हाडांची, पाचपाखाडी

ठाण्यातील मानाची दहिहंडी म्हणजे पाचपाखाडी येथील जितेंद्र आव्हाडांनी आयोजित केलेली हंडी. या दहिहंडीने जगभरात नावलौकीक मिळवले आहे. 'संघर्ष' प्रतिष्ठानच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड ही हंडी उभारतात.

Dahi Handi 2025 | Sarkarnama

Next : PM मोदींपासून ठाकरे बंधूपर्यंत; राजकीय नेत्यांचं अनोखं रक्षाबंधन!

येथे क्लिक करा