Vijaykumar Dudhale
विधानसभेची 2014 आणि 2019 ची निवडणूक लढवल्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा उमेदवारीवर पहिला हक्क होता.
तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांच्यामध्ये समेट घडवून आणली.
प्रशांत परिचारक यांनी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या विजयासाठी अहोरात्र प्रयत्न केले. परिचारक यांनी पंढरपुरात आवताडे यांना मताधिक्क्यही मिळवून दिले.
परिचारक यांच्या मदतीमुळे पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे यांनी बाजी मारली.
आमदार समाधान आवताडे यांनी मतदारसंघातील काही बैठकांना माजी आमदार प्रशांत परिचारक यांना निमंत्रित केले नव्हते, त्यामुळे परिचारक गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तीच दोघांमधील दुराव्याची सुरुवात असावी
संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तर भालके गटाला सोबत घेऊन परिचारक गटाने आमदार समाधान आवताडे यांना आव्हान दिले होते.
आमदार समाधान आवताडे यांनीही पंढरपूर तालुक्यात आपला गट तयार करायला सुरुवात केली आणि पंढरपूरमध्येही आवताडे गटाने आपली ताकद बऱ्यापैकी निर्माण केली आहे.
मतभेद असूनही आमदार समाधान आवताडे हे तीळगूळ देण्यासाठी पंढरपुरातील परिचारक वाड्यावर गेले होते