Sunil Balasaheb Dhumal
सीताक्का या 1988 मध्ये नक्षलवादी चळवळीत सहभागी होत्या. तिथे त्यांनी नक्षलवाद्यांच्या कमांडर पदापर्यंत मजल मारली होती.
पोलिसांसोबतच्या चकमकीमध्ये सीताक्कांचा भाऊ आणि वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी आत्मसमर्पण केले.
दानसारी अनसूया म्हणजेच सीताक्का यांनी रेवंथ रेड्डी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांचा हा प्रवास खडतर ठरला.
टीडीपीत प्रवेश
समाजसेवक म्हणून नेतृत्व करत संयुक्त आंध्रप्रदेशातील चंद्राबाबू नायडू याच्या पक्षामध्ये प्रवेश केला.
सीताक्का यांनी 2022 ओस्मानिया विद्यापीठात राज्यशास्त्र विषयातून पीएचडी केली आहे.
तेलंगणात सीताक्का यांनी मुलुगूमधून निवडणूक लढवत विजयाची हॅटट्रिक केली.
मुख्यमंत्री रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात सीताक्कांसह दोन महिला आमदारांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली.