IPS Success Story: ...थेट मुख्यमंत्र्यांनाच दिलं लग्नाचं निमंत्रण! 'या' महिला आयपीएस अधिकाऱ्याचा भन्नाट किस्सा

Deepak Kulkarni

आयपीएस अधिकारी

तेलंगणा राज्याच्या एक धडाकेबाज व कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी म्हणून चंदना दीप्ती यांची ओळख आहे.

IPS Chandana Deepti | Sarkarnama

2012 मध्ये 'यूपीएससी' परीक्षा क्रॅक

2012 मध्ये 551 वी रँक मिळवून चंदना यांनी 'यूपीएससी' परीक्षा क्रॅक केली.

IPS Chandana Deepti | Sarkarnama

सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ

चंदना यांची तेलंगणासह संपूर्ण देशभरात अफाट लोकप्रियता आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर त्यांची प्रचंड क्रेझ आहे.

IPS Chandana Deepti | Sarkarnama

लेखिका

त्या उत्कृष्ट भरतनाट्यम नृत्यांगना असून तेलगू साहित्यामध्येही लेखिका म्हणून त्यांचं अनमोल योगदान आहे.

IPS Chandana Deepti | Sarkarnama

छंद

'आयपीएस' म्हटल्यावर घड्याळाच्या काट्यावरचं व्यस्त जीवनशैली असतानाही तणाव दूर करण्यासाठी त्या वाचन, पर्यटन आणि टेनिस खेळण्याचा मनमुराद आनंदही लुटतात.

IPS Chandana Deepti | Sarkarnama

शिक्षण

दिल्ली येथून 'आयआयटी'मधून 'कॉम्प्युटर सायन्स' विषयातून 'बी.टेक' पदवीपर्यंतचं शिक्षण चंदना यांनी घेतलं आहे.

IPS Chandana Deepti | Sarkarnama

'आयपीएस'सारख्या पोस्टला गवसणी

तेलंगणामधील वारंगळ जिल्ह्यातून पुढे येत त्यांनी अफाट मेहनत,जिद्द, काटेकोर नियोजन आणि सातत्य यांच्या जोरावर 'आयपीएस'सारख्या पोस्टला गवसणी घातली आहे.

IPS Chandana Deepti | Sarkarnama

नागरिकांच्या तक्रारींचे निवारण हॅशटॅग

एकीकडे सोशल मीडियाचाही गैरवापर सुरू असल्याच्या घटना समोर येत असताना चंदना यांनी नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला. यासाठी त्यांनी फेसबुकवर #AskMedakSP हा हॅशटॅग देखील तयार केला.

IPS Chandana Deepti | Sarkarnama

लग्नाचं मुख्यमंत्र्यांना निमंंत्रण

एक मजेशीर गंमत म्हणजे चंदना दीप्ती यांनी तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री के. सी. राव यांना आपल्या लग्नाचं निमंंत्रण दिलं होतं. तसेच त्यावेळी त्यांनी आपण लवकरच आंध्र प्रदेशची सून होणार असल्याचंही त्यांना सांगितलं होतं.

IPS Chandana Deepti | Sarkarnama

NEXT: निशा सोलंकीची कौतुकास्पद कामगिरी; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तंत्रज्ञानच आणलं बांधावर

Nisha Solanki | Sarkarnama
येथे क्लिक करा..