DSP Kalpana Verma: ब्यूटीफुल अन् डॅशिंग 'डीएसपी' महिला अधिकारी तडकाफडकी सस्पेंड, पोलिस प्रशासनात खळबळ

Deepak Kulkarni

डॅशिंग पोलिस अधिकारी

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या दंतेवाडा येथे डॅशिंग पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत राहिलेल्या डीएसपी कल्पना वर्मा मोठ्या वादात सापडल्या आहेत.

DSP Kalpana Verma Suspend | Sarkarnama

गंभीर आरोप

डीएसपी कल्पना वर्मांवर गंभीर आरोप करण्यात आले असून त्यांचे काही फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

DSP Kalpana Verma Suspend | Sarkarnama

पोलिस प्रशासनात खळबळ

रायपूरचे व्यावसायिक दीपक टंडन यांनी डीएसपी कल्पना वर्मा यांच्यावर 2 कोटी रुपये, 12 लाख रुपयांची हिऱ्याची अंगठी, 5 लाख रुपयांची सोन्याची चेन आणि टॉप्स, एक इनोव्हा क्रिस्टा कार आणि 1 लाख रुपयांचx ब्रेसलेट घेतल्याचा आरोप केल्यामुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

DSP Kalpana Verma Suspend | Sarkarnama

याप्रकरणी मोठी अपडेट

याप्रकरणी दीपक टंडन यांनी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. यावेळी त्यांनी असंख्य पुरावेही पोलिसांकडे दिले होते. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

DSP Kalpana Verma Suspend | Sarkarnama

तडकाफडकी निलंबन

आता छत्तीसगड सरकारने दंतेवाडा जिल्ह्यात तैनात असलेल्या डीएसपी कल्पना वर्मा यांचं तडकाफडकी निलंबन केलं आहे.

DSP Kalpana Verma Suspend | Sarkarnama

पदाचा गैरवापर

सरकारनं कल्पना वर्मा यांच्यावर व्यावसायिकाची प्रेमप्रकरणात आर्थिक फसवणूक आणि पदाचा गैरवापर करून गोपनीय माहिती लिक केल्याचा गंभीर ठपका ठेवला आहे.

DSP Kalpana Verma Suspend | Sarkarnama

कल्पना वर्मा दोषी

याप्रकरणी गृह विभागाकडून करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत कल्पना वर्मा या दोषी आढळल्याचं समोर आल्यानंतर निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. चौकशीत नोंदवलेले जबाब, व्हॉट्स अप चॅट, आर्थिक व्यवहारांमध्ये तफावत दिसून आली आहे.

DSP Kalpana Verma Suspend | Sarkarnama

1475 पानांचा अहवाल

छत्तीसगड सरकारच्या गृहविभागानं या प्रकरणाची अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी केल्याचं म्हटलं आहे. तसेच चौकशीसंबंधीचा तब्बल 1475 पानांचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आल्याचंही समोर आलं आहे.

DSP Kalpana Verma Suspend | Sarkarnama

गंभीर बाबी

कल्पना वर्मा यांच्या संबंधी काही गंभीर बाबी सादर करण्यात आलेल्या अहवालातून समोर आल्या आहेत. व्यावसायिक दीपक टंडन यांनी त्यांच्या पोलिस तक्रारीत 2021 पासून वर्मा यांनी त्यांना 'लव्ह ट्रॅप'मध्ये अडकवून 2.5 कोटी रुपये उकळल्याचा आरोप केला आहे.

DSP Kalpana Verma Suspend | Sarkarnama

NEXT: देशाच्या प्रशासकीय सेवेत सर्वाधिक IAS अन् IPS देणारं राज्य कुठलं, माहितीय? तुमचा अंदाज चुकू शकतो

UPSC Exam | Sarkarnama
येथे क्लिक करा...