UPSC Exam: देशाच्या प्रशासकीय सेवेत सर्वाधिक IAS अन् IPS देणारं राज्य कुठलं, माहितीय? तुमचा अंदाज चुकू शकतो

Deepak Kulkarni

सर्वात प्रतिष्ठात्मक अन् आव्हानात्मक

संघ लोकसेवा आयोगाची यूपीएससी परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठात्मक अन् आव्हानात्मक आव्हानात्मक समजली जाते. देशभरातील लाखो विद्यार्थी या परीक्षेची कसून तयारी करत असतात.

UPSC EXAM | Sarkarnama

प्रशासकीय सेवेत कामाची संधी

UPSC ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आयएएस, आयपीएस, आयआरएस, आयआयएस अशा अनेक पदांवर प्रशासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळते.

UPSC EXAM | Sarkarnama

या शहरांचा समावेश

देशात कोटा, पुणे,दिल्ली, चेन्नई,लखनौ, मुंबई, हैद्राबाद, बंगळुरु यांसारख्या शहरांतून यूपीएससी परीक्षेची तयारी करुन घेणाऱ्या संस्था आहेत.

UPSC EXAM | Sarkarnama

सर्वाधिक कोचिंग सेंटर

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठीचे सर्वाधिक कोचिंग सेंटर आहेत. तिथेच अनेकजण परीक्षेची तयारी करत असतात. गेल्या पाच वर्षांपासून चार यूपीएससी परीक्षेत टॉपर उत्तर प्रदेशचे राहिले आहेत.

UPSC EXAM | Sarkarnama

उत्तर प्रदेश

यूपीएससी परीक्षेच्या माध्यमातून सर्वात जास्त आयएएस आणि आयएएस हे उत्तर प्रदेश या राज्यातून पुढे येतात.

IAS -IPS | Sarkarnama

बिहार

भारतीय प्रशासकीय सेवांचे माहेरघर समजले जाणारे बिहार राज्य यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. बिहारच्या ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये आयएएस IAS किंवा आयपीएस होण्यामध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळते.

IAS -IPS | Sarkarnama

राजस्थान

तर दुसरीकडे राजस्थाननेही यूपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आलं आहे. सध्या हे राज्य आयएएस अधिकारी देण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं राज्य आहे.

IAS -IPS | Sarkarnama

तमिळनाडू-महाराष्ट्र

दक्षिणेतील तमिळनाडू राज्यासह महाराष्ट्रातही दरवर्षी मोठ्या संख्येनं यूपीएससीची परीक्षा विद्यार्थी उत्तीर्ण होत असतात. तमिळनाडूमधूनही दक्षिण भारतातील सर्वात जास्त विद्यार्थी यूपीएससी क्रॅक करतात.

IAS -IPS | Sarkarnama

दिल्ली

दिल्लीचाही दरवर्षी मोठ्या प्रमाणात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खूप वरचा क्रमांक लागतो.

UPSC IAS -IPS | Sarkarnama

NEXT: 'परीक्षा पे चर्चा' पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विद्यार्थ्यांसोबतचे फोटो पाहिले का?

Pariksha Pe Charcha | Sarkarnama
येथे क्लिक करा...