Chetan Zadpe
मुंबई 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटाचा प्रमुख सूत्रधार दाऊद इब्राहीमवर विषप्रयोग झाल्याची बातमी समोर आली होती. यानंतर सोशल मीडियावर एकच धुमाकूळ सुरू झाला.
अनेकवेळा दाऊद विविध वृत्तसंस्थानी दिलेल्या बातम्यांमध्ये मरण पावला असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्येकवेळा या अफवाच ठरल्या.
कोरोनाकाळात दाऊदच्या मरणाची बातमी समोर आली होती. कोरोनाची लागण होऊन दाऊद मरण पावला असा दावा केला जात होता. मात्र ही देखील अफवाच ठरली.
2017 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने दाऊदच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. मात्र ही बातमीही अफवाच ठरली.
वर्ष 2016 मध्येही दाऊदच्या पायाला गँगरीन झाल्याची बातमी समोर आली होती. यामुळे दाऊदचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होत, ही पण शेवटी अफवा ठरली.
पाकिस्तानतल्या कराचीमध्ये दाऊदवर विषप्रयोग झाल्याची बातमी आता समोर आली आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
मागील काही दिवसांमध्ये अनेक मोस्ट वाँटेड आरोपींची निधनाची बातमी समोर आली होती . त्यामुळे दाऊदच्या मृत्यूची बातमी समोर येताच अनेकांनी ती खरी वाटली.
दाऊदच्या मृत्यूबाबत किंवा विषप्रयोगाबाबत भारत अन् पाकिस्तान सरकारकडून अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही.