Chetan Zadpe
रायझोर दलाचे संस्थापक अखिल गोगाई यांनी 2021 च्या आसाम विधानसभा निवडणुकीत सिबसागर या मतदारसंघातून विजय मिळवला होता. यावेळी ते देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात होते. तुरुंगातून निवडणूक जिंकणारे ते आसामचे पहिले नेते ठरले.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातले रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक जेलमधून विक्रमी मतांनी जिंकली. निवडणुकी दरम्यान ते शेतकऱ्यांचे नावे बनावट कर्ज उचलल्याच्या आरोपात जेलमध्ये होते.
समाजवादी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी आपली पहिली लोकसभा निवडणूक तुरुंगातून जिंकली होती. १९७४ मध्ये जबलपूरच्या जागेवर पोटनिवडणूक झाली. याच दरम्यान जेपींच्या आंदोलन दरम्यान यादव तुरुंगात बंद होते. जेलमधूनच उमेदवारी दाखल करुन त्यांनी निवडणूक जिंकली.
2022 च्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकी दरम्यान समाजवादी पार्टीचे नेते आझम खान काही आरोपांखाली जेलमध्ये होते. याचवेळी त्यांनी रामपूर या आपल्या मतदारसंघातून विजय मिळवला.
2022 च्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीचे उमेदवार नाहिद हसन यांनी निवडणूक जिंकली. गँगवार आणि गुन्हेगारी कृत्यांमुळे ते मतदानावेळी जेलमध्ये होते.
बिहार मधील नेते आनंद मोहन यांना एका हत्येच्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, नंतर ही शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. या आरोपात शिक्षा भोगत असताना त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली होती.
उत्तर प्रदेशातील बाहुबली नेते राजा भैया यांनी 2002 ची विधानसभा निवडणूक जेलमधून जिंकली होती. कुंडा मतदारसघातून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.
मुख्तार अन्सारी हे पूर्वांचलचे ताकदवान नेते आहेत. ते 'मऊ-सदर या मतदारसंघातून बसपाचे आमदार राहिले होते. 2017 मध्ये त्यांनी तुरुंगातून ही निवडणूक जिंकली होती.
तुरुंगात कैद असताना निवडणूक लढवणाऱ्यांमध्ये गोरखपूरचे ताकदवान आमदार राहिलेले हरिशंकर तिवारी यांचेही नाव आहे. तुरुंगात असताना 1985 मध्ये गोरखपूरमधून लढले आणि जिंकले.
अखिलेश सिंह आता हयात नाहीत. रायबरेली सदर मतदारसंघातून ते ५ वेळा आमदार राहिले आहेत. भाजप नेत्या अदिती सिंह त्यांची मुलगी आहे. अखिलेश सिंह तुरुंगात असताना विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता.