Roshan More
मुंबई पोलिस दलातून आज (गुरुवारी) दया नायक ACP म्हणून सेवानिवृत्त झाले. दोनच दिवसांपूर्वी ACP म्हणून बढती मिळाली होती.
मुंबईत अंडरवर्ल्डचे वर्चस्व मुंबई पोलिसांनी मोडून काढले, त्यामध्ये दया नायक यांचा वाटा होता. त्यांनी तब्बल 86 एन्काऊंटर केले आहेत. त्यामध्ये दाऊद टोळीतील 22 गुंडांचा तर, राजन टोळीतील 20 गुंडांचा एन्काऊंटरचा समावेश आहे.
दया नायक हे मुळचे कर्नाटकचे आहेत. सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते कामाच्या शोधात मुंबईत आले.
मुंबईतील एका हाॅटेलमध्ये ते वेटरची नोकरी करत होते. आणि गोरेगावमधील शाळेतून पुढील शिक्षण घेत होते.
वेटर म्हणून काम करत असताना दया नायक यांचा अंमल पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांशी संपर्क आला. तेव्हाच त्यांनी निश्चित केले की पोलिस अधिकारी व्हायचे.
1996 मध्ये त्यांनी छोटा राजनच्या दोन गुंडांचा एन्काऊंटर केला. तेव्हापासून ते एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले.
दया नायक यांनी बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा देखील त्यांचा आरोप होता. त्यांच्या चौकशी होऊन त्यांनी पोलिस दलातून निलंबित देखील करण्यात आले होते. मात्र, त्यांना नंतर पुन्हा पोलिस सेवेत घेण्यात आले.