Aslam Shanedivan
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल 17 वर्षानंतर न्यायालयाने दिला. न्यायालयाने सर्व सातही आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
यामध्ये भाजपच्या नेत्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी असे सात आरोपी होते.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भोपाळच्या माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर मुख्य आरोपी होत्या. तर या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेली दुचाकी ठाकूर यांची होती असा आरोप होता.
या प्रकरणात लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे मुख्य सूत्रधार असून त्यांनी बॉम्ब बनवण्यासाठी त्यांनी आरडीएक्स पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
निवृत्त मेजर रमेश उपाध्याय हे अभिनव भारत या संघटनेचे सदस्य असून त्यांचा या बॉम्बस्फोट प्रकरणात सक्रिय सहभाग असल्याचा आरोप होता.
अजय राहिरकर हे अभिनव भारत संघटनेचे कोषाध्यक्ष असून त्यांच्यावर आर्थिक मदत पुरवल्याचा आरोप होता.
सुधाकर द्विवेदी उर्फ दयानंद पांडे यांच्यावर धार्मिक विचारधारेच्या माध्यमातून लोकांना भडकवण्याचा आरोप होता.
सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर या बॉम्बस्फोटाचा कट रचण्यासाठी झालेल्या बैठकांमध्ये ते देखील सहभागी झाले होते असा आरोप होता.
या प्रकरणातील आरोपी समीर कुलकर्णी यांच्यांवर बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या स्फोटक रसायनांची व्यवस्था केल्याचा आरोप होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.