सरकारनामा ब्यूरो
महायुती सरकारच्या स्थापनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत पंतप्नधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह या नेत्याची भेटी घेतली.
एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (ता.26) पंतप्नधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
विकसित भारताच्या वाटचालीसाठी राज्याच्या योगदानाबाबत पंतप्रधानांबरोबर चर्चाही केली.
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
अमित शाह यांना पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीही भेट म्हणून दिली.
यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या वाटचालीबाबत शाहांशी चर्चा केली.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्याही निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
जे.पी. नड्डांंना पारंपरिक शाल आणि प्रभू श्रीरामाची मूर्ती भेट दिली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदेही उपस्थित होते.